मराठी कविता
सौजन्य - विक्रम सरकताई
आईबाबा रागवल्यावर
समजुत काढणारी ती ताई
पण चुकीचे वागल्यावर
रागीट रुप धारण करणारी ती ताई
कधी गणित चुकल्यावर
समजुन सांगणारी ती ताई
पण फोनविषयी आपल्याला
माहिती विचारणारी ती ताई
एखाद्या हट्टापायी रुसल्यावर
समजुत काढणारी ती ताई
आईबाबा बाहेर गेल्यावर प्रेमाने
शिराचा घास भरवणारी ती ताई
रक्षाबंधनला तिच्या आवडीचे
गिफ्ट घेतल्यावर खुष होणारी ताई
वाढदिवसाला खुष होऊन गिफ्ट व
छानसा गालावर पापा देणारी ती ताई
Comments
Post a Comment